पाचपैकी ३ राज्यांमध्ये राष्ट्रवादी निवडणूक लढणार - शरद पवार|NCP Contest 3 States Assembly Election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCP Contest manipur goa and uttar pradesh election

पाचपैकी ३ राज्यांमध्ये राष्ट्रवादी निवडणूक लढणार - शरद पवार

मुंबई : देशात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका (Five States Assembly Election) आहेत. या पाचपैकी तीन राज्यात राष्ट्रवादी (NCP) निवडणूक लढणार आहे. त्यासाठी शरद पवार लवकरच उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर (Sharad Pawar UP Visit) जाणार आहेत. याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

हेही वाचा: 'उदयनराजेंना रयतच्या बॉडीवर घ्या, शरद पवार आपोआप अध्यक्षपद सोडतील'

उत्तर प्रदेश, मणिपूर आणि गोव्यात राष्ट्रवादी निवडणूक लढणार आहे. मणिपूरमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र पाच जागांवर निवडणूक लढवणार आहे. उत्तर प्रदेशात लोकांना बदल हवा आहे. त्यांना खोटे आश्वासन दिले जात आहेत. उत्तर प्रदेश भाजपचे नेते पक्ष सोडून जात आहेत. आणखी काही नेते पक्ष सोडतील, अशी टीका पवारांनी भाजपवर केली. उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रवादी समाजवादी पक्ष आणि इतर छोट्या छोट्या पक्षांसोबत युती करणार आहे. याबाबत उद्या बैठक होणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीची नेते तिथे जाणार आहेत, असंही पवारांनी सांगितलं.

''गोव्यातून भाजपला हाकलण्याची गरज'' -

राष्ट्रवादी गोव्यात देखील निवडणूक लढणार आहे. गोव्यात परिवर्तन करण्याची गरज आहे. तिथून भाजपची हकालपट्टी करायची आहे. गोव्यामध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेससोबत एकत्र लढण्याच्या विचारात आहोत, असं पवार म्हणाले.

नुकत्याच निवडणुकीच्या तारखा जाहीर -

देशात उत्‍तर प्रदेश (Uttar Pradesh), पंजाब (Punjab), उत्‍तराखंड (Uttarakhand), गोवा (Goa) आणि मणिपूर (Manipur) या पाच राज्यांमध्ये निवडणुका होत आहे. नुकतेच आयोगाने 2022 या वर्षात पाच महत्त्वाच्या राज्यात होणाऱ्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

Web Title: Ncp Will Contest Assembly Election In Manipur Goa And Uttar Pradesh Says Sharad Pawar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top