
नवी दिल्ली : माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची संसद भवनातील कार्यालयात भेट घेतली. ‘‘फलटणच्या शेतकऱ्यांनी उत्पादन केलेली नव्या वाणाची डाळिंबे देण्यासाठी पंतप्रधान मोदींची ही भेट होती,’’ असे शरद पवार यांनी सांगितले. याव्यतिरिक्त उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांचीही शरद पवार यांनी आज भेट घेतली.