esakal | शरद पवार यांनी काँग्रेसवर केलली टीका अचूक आहे - दानवे
sakal

बोलून बातमी शोधा

raosaheb danve

शरद पवार यांनी काँग्रेसवर केलली टीका अचूक आहे - दानवे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी काँग्रेसवर केलली टीका अचूक आहे. कारण ते त्या घरात राहिले आहेत. त्या घराचे कोणते खांब ढासळले, याची त्यांना चांगली माहिती आहे, अशा शब्दांत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पवारांच्या टिकेचे समर्थन केले. ते इमारतीला बाहेरून टेकू देत आहेत, ते काँग्रेसच्या त्या पडक्या हवेलीत कधीच जाणार नाहीत, असे मतही दानवे यांनी व्यक्त केले.

दानवे यांच्याबरोबर दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी सकाळने संवाद साधला. महाराष्ट्रातील राजकीय टिकांबाबत बोलताना त्यांनी हे भाष्य केले. राज्यातील सरकार हे अमर, अकबर, अँथनीचे सरकार आहे. ते समान उदि्दष्ट ठेऊन एकत्र आले आहे. त्यामुळे पवार किती टोकदार बोलले, तर सरकार पडणार नाही. त्यांचा उद्देश साध्य झाला की ते सरकार असे‌ पडेल की त्यांनाच कळणार नाही. पवारांची टीका ही सत्य आहे. आता त्यांना काँग्रेस परत बोलवत आहे. पण पवार त्या पडक्या घरात जाणार नाहीत.

हेही वाचा: वैद्यकीय क्षेत्रात 5000 पदांसाठी बंपर भरती

ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होत आहेत. याबाबत ते म्हणाले, "राज्य सरकारने एम्पिरिकल डाटा कोर्टात सादर केला नाही. त्यामुळे आरक्षण टिकले नाही. या सरकारने वकिलांची फौज न्यायालयात उभी करायला पाहिजे होती. पण ते या सगळ्याचे खापर केंद्रावर फोडत राहिले. आता हा धंदा त्यांनी बंद करावा. केवळ मोर्चे काढून आणि स्वत:ला ओबीसी नेता असल्याचे मिरवत आरक्षण मिळणार नाही. ओबीसी समाजाची दिशाभूल करण्यापेक्षा सरकारने पुरावे सादर‌ करावेत, केवळ समाजासमोर चमकू नये, असा सल्ला दानवे यांनी छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार यांना दिला.

ईडी, सीबीआयचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप केला जातोय, या प्रश्नावर दानवे यांना हा आरोप फेटाळला. ते म्हणाले, " अशोक चव्हाण यांची चौकशी कुणी केली? छगन भुजबळ, सुरेश कलमाडी, लालू प्रसाद यादव या नेत्यांना जेलमध्ये कुणी पाठवले? भाजप सरकार त्यावेळी नव्हते. या संस्थांचा वापर हा काँग्रेसच्या काळापासूनच सुरू आहे. आम्ही त्याचा कधीही गैरवापर केलेला नाही. ज्यांची चौकशी सुरू आहे, त्यांच्यावर आरोपही गंभीर आहेत."अनिल देशमुख कुठे हे राज्य सरकारला माहिती आहे. ते कुठे जाणार आहेत? ते सापडत नसतील, तर हे राज्य सरकारचे अपयश आहे. त्यांना सरकारने शोधावे, असे दावने म्हणाले.

loading image
go to top