esakal | India: चीनबाबत राजकारण नको : पवार
sakal

बोलून बातमी शोधा

 शरद पवार

चीनबाबत राजकारण नको : पवार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘‘भारत आणि चीन दरम्यान वाढत्या तणावाची दखल घेत हा विषय राजकारणाच्या बाहेर असून सर्वपक्षीय नेत्यांनी यामध्ये सहभागी होत केंद्र सरकार सोबत चर्चा करावी,’’ अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज मांडली. राष्ट्रवादी भवनामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पवार यांनी चीन सोबतचे धोरण आणि आपल्या आजूबाजूच्या देशांची सद्यःस्थिती यावर चिंता व्यक्त केली.

यावेळी ते म्हणाले, ‘‘चीन सोबतच्या संवादाची तेरावी फेरी नुकतीच अयशस्वी झाली. एका बाजूला संवाद अयशस्वी होत असताना दुसरीकडे काश्‍मीरच्या पूँचमध्ये दहशतवादी हल्ल्यात पाच जवान हुतात्मा झाले. हे दुर्दैवी आहे. सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन चर्चा करायची गरज आहे.

हेही वाचा: जालना : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

शेजारील देशांवर चीनचा प्रभाव

पवार म्हणाले की, चीन हा आपला शेजारचा मोठा भाऊ आता पूर्वीसारखा राहिला नाही. पाकिस्तान, भूतान, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका या देशांत चीनचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे या प्रकरणात राजकारण न करता एकत्रितपणे निर्णय घ्यायला हवेत. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्करप्रमुखांनी चीनच्या बाबत माझ्यासोबत ए. के. अँटनी यांच्यासोबत चर्चा केली होती. आम्ही दोघेही भारताचे माजी संरक्षण मंत्री असल्याने आमच्यासोबत चर्चा झाली. मात्र या चर्चेचा अधिक तपशील देता येणार नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

loading image
go to top