esakal | Marathwada: लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
sakal

बोलून बातमी शोधा

crime
जालना : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

जालना : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जालना : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी संशयित रवी दगडू वाघचौरे याला चंदनझिरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पितृपक्षाच्या कार्यक्रमासाठी चंदनझिरा येथे राहणाऱ्या चुलत्याकडे अंतरवाला (ता. जालना) येथील अल्पवयीन मुलगी आली होती. मात्र, ही मुलगी ता.२६ सप्टेंबर रोजी अचानक गायब झाली होती. याप्रकरणात चंदनझिरा पोलिस ठाण्यात मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करताना या मुलीला चंदनझिरा भागात राहणाऱ्या रवी वाघचौरे याने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याचे उघड झाले होते.

हेही वाचा: मोदींनी केला दहा लाख कोटींच्या गतीशक्ती योजनाचा शुभारंभ

दोघेजण जालन्यात आल्याचे पोलिसांना कळाले, त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी अल्पवयीन मुलीने चौकशीदरम्यान लैंगिक अत्याचार झाल्याचा जबाब नोंदविला आहे. या प्रकरणी संशयित रवी दगडू वाघचौरे (रा. दुर्गानगर, चंदनझिरा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रियांका तूपे करीत आहेत.

loading image
go to top