शरद पवारांवर हल्ला करणाऱयाला 8 वर्षांनी अटक

वृत्तसंस्था
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्ला करणाऱयाला दिल्ली पोलिसांनी आठ वर्षांनी आज (बुधवार) अटक केली.

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्ला करणाऱयाला दिल्ली पोलिसांनी आठ वर्षांनी आज (बुधवार) अटक केली. अरविंदर सिंग (वय 36) असे त्याचे नाव असून, 2014 पासून तो फरार होता. हरविंदर सिंग या नावानेही त्याची ओळख होती.

2011 मध्ये शरद पवार केंद्रीय कृषी मंत्री असताना दिल्लीतील एनडीएमसी सेंटरमध्ये एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. तिथून बाहेर निघताना अरविंदरने त्यांच्यावर अचानक हल्ला केला होता. यानंतर अरविंदर फरार झाला होता. दिल्ली न्यायालयाने 2014 मध्ये त्याला गुन्हेगार घोषित केले होते. दिल्लीत ट्रान्सपोर्टर म्हणून काम करणाऱ्या अरविंदर सिंगला पोलिसांनी ताब्यात घेतले. दिल्ली पोलिसावर हल्ला केल्याप्रकरणी सुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तपासादरम्यान तो म्हणाला, 'महागाईमुळे आणि भ्रष्टाचाराने वैतागलो होतो. योजना करून कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर हल्ला करायला त्यावेळी आलो होतो.'

दरम्यान, शरद पवार यांनी त्यावेळी या प्रकरणाला जास्त महत्व देण्याची गरज नाही, असे म्हटलं होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawars attacker Arvinder Singh arrested at delhi