Sharad Yadav Passed Away : तब्बल 25 वर्षाचं वैर संपवून मोदींचा पराभव करण्यासाठी शरद-लालू आले होते एकत्र!

बिहारच्या राजकारणातील मोठे नेते शरद यादव (Sharad Yadav) आता या जगात नाहीयेत.
Sharad Yadav Passed Away
Sharad Yadav Passed Awayesakal

Sharad Yadav Passed Away : बिहारच्या राजकारणातील मोठे नेते शरद यादव (Sharad Yadav) आता या जगात नाहीयेत. मात्र, आयुष्याच्या शेवटपर्यंत ते राजकारणात गुंतत राहिले. गेल्या वर्षी (2022) बिहारमध्ये मोठी उलथापालथ झाली होती.

विरोधकांना बळ देण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (Narendra Modi) भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी शरद यादव यांनी लालू यादव (Lalu Yadav) यांच्याशी असलेलं 25 वर्षांचं राजकीय वैर संपवलं होतं.

लोकतांत्रिक दल आरजेडीत विलीन

2018 मध्ये शरद यादव, अली अन्वर आणि अनेक नेत्यांनी जेडीयूपासून वेगळं होऊन लोकतांत्रिक जनता दल नावाचा पक्ष स्थापन केला, पण मार्च 2022 मध्ये त्यांनी आपला पक्ष लालू यादव यांच्या आरजेडीमध्ये विलीन केला. यादरम्यान शरद यादव म्हणाले होते, 'माझ्या पक्षाचं राजदमध्ये विलीनीकरण हे विरोधी ऐक्याच्या दिशेनं पहिलं पाऊल आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी संपूर्ण भारतातील विरोधकांनी एकत्र येणं गरजेचं आहे.'

1997 मध्ये सुरू झाला शरद-लालूंमध्ये वाद

1997 सालची गोष्ट आहे, जेव्हा शरद यादव आणि लालू यादव एकाच पक्षात होते. त्या काळात शरद यादव जनता दलाचे कार्याध्यक्ष होते. या वर्षी जुलै महिन्यात जनता दलाच्या अध्यक्षपदासाठी लालू यादव आणि शरद यादव आमनेसामने आले होते. या निवडणुकीसाठी लालू यादव यांनी त्यांचे सहकारी रघुवंश प्रसाद सिंह यांना निवडणूक अधिकारी बनवलं होतं. मात्र, याविरोधात शरद यादव सर्वोच्च न्यायालयात गेले आणि रघुवंश प्रसाद सिंह यांना हटवून मधू दंडवते यांना निवडणूक अधिकारी बनवलं.

Sharad Yadav Passed Away
Indian Medicines : उझबेकिस्तानमध्ये 19 मुलांचा मृत्यू; WHO म्हणतं, भारतात तयार होणारी 'ही' औषधं मुलांना देऊ नका!

वेळीच लालूंच्या लक्षात आली 'ती' गोष्ट

जनता पक्षाचे कार्याध्यक्ष या नात्यानं शरद यादव यांनी कार्यकारिणीत आपलं स्थान खूप मजबूत केलं होतं. एवढंच नाही तर राजकारणातील जाणकार लालू प्रसाद यादव यांनाही शरद विरोधात निवडणूक लढवली तर पराभव होणार हे लक्षात आलं होतं. अशा परिस्थितीत त्यांनी जनता दलापासून फारकत घेऊन राष्ट्रीय जनता दल हा वेगळा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला. 2005 मध्ये बिहारमधील आरजेडीची 15 वर्षांची सत्ता संपवण्याच्या मोहिमेत शरद यादवांनंतर नितीश कुमार यांच्यासोबत सामील झाले.

Sharad Yadav Passed Away
Cricket Series : ऑस्ट्रेलियानं अफगाणिस्तानविरुद्ध ODI मालिका खेळण्यास दिला नकार; जाणून तुम्हालाही अभिमानचं वाटेल!

बिहारच्या राजकारणाचा मोठा चेहरा

1991 ते 2014 पर्यंत शरद यादव बिहारच्या मधेपुरा मतदारसंघातून खासदार होते. 1995 मध्ये ते जनता दलाचे कार्याध्यक्ष म्हणून निवडून आले. 1996 मध्ये त्यांनी पाचव्यांदा लोकसभा निवडणूक जिंकली. 1997 मध्ये त्यांची जनता दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. 1998 मध्ये शरद यादव यांनी जॉर्ज फर्नांडिस यांच्या मदतीनं जनता दल युनायटेड पार्टीची स्थापना केली, यामध्ये नितीश कुमार सामील झाले. एकेकाळी त्यांचा नितीशकुमार यांच्याशी वाद झाला होता.

Sharad Yadav Passed Away
Narendra Modi : आमचं भविष्य सर्वात जास्त धोक्यात; शिखर परिषदेत असं का म्हणाले PM मोदी?

शरद यांनी लालूंचा केला होता पराभव

1986 मध्ये शरद यादव राज्यसभेतून खासदार म्हणूनही निवडून आले होते. यानंतर त्यांनी 1989 मध्ये उत्तर प्रदेशातील बदायूंमधून लोकसभा निवडणूक जिंकली. मात्र, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत त्यांना मधेपुरा जागेवर पराभवाचा सामना करावा लागला होता. लोकसभा निवडणुकीत मधेपुरामधून लालूंचा पराभव करणारे शरद यादव हे असेच एक व्यक्ती होते.

Sharad Yadav Passed Away
Balasaheb Patil : 'पुरोगामी महाराष्ट्रात असलं चालणार नाही, मुश्रीफ लवकरच ED ला उत्तर देतील'

2018 मध्ये सुरू झाली राजकीय पडझड

2018 मध्ये शरद यादव यांनी नितीश कुमार यांच्यापासून फारकत घेतली आणि लोकतंत्री जनता दल नावाचा पक्ष स्थापन केला. मात्र, जेडीयूपासून वेगळं झाल्यानंतर याच काळात त्यांची राजकीय पडझड सुरू झाली होती. जेडीयूपासून वेगळं झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकट्यानं निवडणूक लढवली नाही. लोकतांत्रिक जनता दलाचे पक्षप्रमुख असताना शरद यादव यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक आरजेडीच्या तिकिटावर लढवली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com