देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली जेएनयूच्या शर्जील इमामला अटक

वृत्तसेवा
Tuesday, 28 January 2020

  • दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी नेता शर्जील इमामला आज देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली.

नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी नेता शर्जील इमामला आज देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली. बिहारमधील जहानाबाद जिल्ह्यातून त्याला अटक करण्यात आली आहे. सीएए कायद्याच्या विरोधात शाहीन बाग येथे करण्यात आलेल्या निदर्शनांमागे शर्जीलचा मुख्य सहभाग असल्याचे सांगत त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्लीसह पाटणा व मुंबईतही काही ठिकाणी छापे टाकण्यात आल्यानंतरही शर्जील हाती लागला नव्हता. आज (ता.२८) त्याला जहानाबादमधील काको येथून अटक करण्यात आली. शर्जीलच्या वकिलांनी मात्र शर्जील स्वत:हून पोलिसांपुढे हजर झाला असल्याचे सांगितले आहे. हजर झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली असल्याचा दावा वकिलांकडून करण्यात आला आहे.

सुबोध भावे दिसणार शरद पवारांच्या भूमिकेत?

तत्पूर्वी, शर्जीलविरुद्ध दिल्लीसह बिहार, आसाम, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, मणिपूर अशा एकूण सहा राज्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून दिल्ली पोलिसांची पाच पथके त्याच्या मागावर होती. अखेर दिल्ली पोलिसांना आज त्याला अटक करण्यात यश आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharjeel Imam, JNU Student Accused Of Sedition, Arrested In Bihar