सुबोध भावे दिसणार शरद पवारांच्या भूमिकेत?

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 जानेवारी 2020

सुबोध फक्त शरद पवारांना भेटलाच नाही, तर त्याने पवारांना एक इच्छाही बोलून दाखवली. त्यामुळे या दोघांच्या भेटीची सध्या एकच चर्चा होतीय. 

सध्या बायोपिक म्हणलं की आपसूक नाव निघतं ते म्हणजे सुबोध भावेचं! आता तो पुन्हा एकदा चर्चेत आलाय ते म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीमुळे. सुबोध फक्त शरद पवारांना भेटलाच नाही, तर त्याने पवारांना एक इच्छाही बोलून दाखवली. त्यामुळे या दोघांच्या भेटीची सध्या एकच चर्चा होतीय. 

मोदींनंतर थलैवा रजनीकांत गाजवणार 'Man Vs Wild'!; शूटींगला सुरवात

सर्वांचा लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे याने सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी त्याने एक इच्छा बोलून दाखवली. सुबोधने यापूर्वीही शरद पवारांची भूमिका साकारायला आवडेल असे मत व्यक्त केले होते. या भेटीत त्याने 'सातत्याने व्यक्त होणाऱ्या नेत्यांपेक्षा एक नेता जो योग्य ठिकाणी योग्य वेळ येताच व्यक्त होतो, अशा नेत्याची भूमिका करायला मला नक्कीच आवडेल' असे उद्गार काढले आहेत. यावरून तो शरद पवारांची भूमिका साकारण्यास उत्सुक दिसतो अशी चर्चा आहे.

सुबोधने यापूर्वीही पवारांची भूमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केली होती. 'आपल्या मनात काय चाललंय हे कोणालाच कळू न देता 55 वर्ष राजकारणात पवार आहेत. त्यांनी जेवढं बघितलंय तेवढं कोणीच बघितलं नाही.' अशी प्रतिक्रिया त्याने मागच्या वेळी दिली होती. तसेच काल झालेल्या भेटीमुळे सुबोधने शरद पवारांवरील बायोपिक केल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका. 

आमिरच्या 'त्या' रिकवेस्टमुळे खिलाडी कुमारने बदलली रिलिज डे

राष्ट्रवादीच्या ट्विटर हँडलवरून या दोघांचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. सुबोधने यापूर्वी लोकमान्य टिळक, बालगंधर्व, काशिनाथ घाणेकर यांच्या भूमिका साकारल्या होत्या. सध्या तो 'AB आणि CD' या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे, यात तो बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Possibility of Subodh Bhave to play Sharad Pawar s role in the biopic