

Shashi Tharoor Accuses Centre of Blocking 115 Foreign Delegates from Bharat Summit
esakal
Bharat Summit 2026: हैदराबादमध्ये आयोजित दुसऱ्या 'भारत समिट'मध्ये परदेशी वक्त्यांच्या प्रवेशावरून नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी या समिटसाठी निमंत्रित केलेल्या 315 वक्त्यांपैकी 115 जणांना भारतात प्रवेश नाकारण्यात आल्याचा किंवा त्यांचे व्हिसा रद्द करण्यात आल्याचा आरोप केला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार ही कारवाई झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.