Shashi Tharoor : सुप्रिया सुळेंसोबतच्या व्हिडिओवर शशी थरूर यांचं स्पष्टिकरण, म्हणाले.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shashi Tharoor explained on talking to mp supriya sule in parliament meme video

सुप्रिया सुळेंसोबतच्या व्हिडिओवर शशी थरूर यांचं स्पष्टिकरण, म्हणाले..

काँग्रेस खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) पुन्हा एकदा ट्विटरवर चर्चेचा विषय बनले आहेत. सध्या सोशल मीडियावर काही सेकंदांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) संसदेत भाषण करत आहेत. तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) आणि शशी थरूर त्यांच्या मागे बोलताना दिसत आहेत.

यातच ट्विटरवरील ‘फारअगो अब्दुला’ या नावाच्या खात्यावरून एक व्हिडीओ क्लीप पोस्ट करण्यात आली आहे. यात फारूख अब्दुल्ला भाषण करताना दिसत आहेत. त्यांच्या मागे सुप्रिया सुळे बसल्या असून शशी थरूर पुढे झुकून, हनुवटी बाकावर टेकवून सुळे यांच्याशी गप्पा मारण्यात दंग आहेत असे दिसत आहे. या क्लिपमध्ये मूळ आवाज काढून त्याऐवजी ‘पुष्पा’ सिनेमातील ‘श्रीवल्ली’ हे गाणे लावण्यात आले आहे. तसेच इतरांनी देखील अनेक मिम्स पोस्ट केल्या आहेत. आता या व्हिडिओवर कॉंग्रेसचे नेते शशी थरूर यांनी ट्विट करत स्पष्टीकरण दिलं आहे.

हेही वाचा: बापरे! रक्तानंतर आता मानवी फुफ्फुसात देखील आढळलं मायक्रोप्लास्टिक

थरूर यांनी या प्रकरणावर ट्विट करत स्पष्टीकरण दिलं आहे, त्यांनी सांगितलं की सुप्रिया सुळे या फारुख अब्दुल्ला यांच्या नंतर बोलणार होत्या त्यामुळे त्या प्रश्न विचारत होत्या. ट्विटमध्ये थरूर यांनी लिहिलं की, "सुप्रिया सुळे आणि माझ्यात झालेल्या लहानशा संवादावरुन आपापसात मजा घेत असलेल्या सर्वांसाठी, त्या मला काही धोरणात्मक प्रश्न विचारत होत्या कारण, त्या पुढे बोलणार होत्या. फारुखसाहेबांना त्रास होऊ नये म्हणून त्या हळूवारपणे बोलत होत्या, म्हणून मी त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी पुढे झुकलो." असे स्पष्ट केलं आहे. दरम्यान ट्विटरवर यासंबंधी अनेक मिम्स पोस्ट केल्या जात आहेत.

हेही वाचा: योगींविषयी अक्षेपार्ह विधान; सपा आमदाराच्या पेट्रोल पंपावर चालला बुलडोझर

Web Title: Shashi Tharoor Explained On Talking To Mp Supriya Sule In Parliament Meme Video

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..