
नवी दिल्ली : ‘‘आमच्या पक्षासाठी कायम देशाला प्राधान्य आहे. मात्र, काही जणांसाठी मोदी प्रथम, देश नंतर असे सूत्र आहे,’’ असा टोला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांना लगावला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देणाऱ्या लेखामध्ये थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली आहे. त्या पार्श्वभूमीवर विचारले असता खर्गे यांनी हा टोला लगावला आहे.