''लोकसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष बनेल, पण...'' काँग्रेस नेते शशी थरुर यांचा मोठा दावा

''भाजपला मागच्या वेळीपेक्षा कमी जागा मिळतील, त्यांच्या खासदारांची संख्या कमी होईल.'' असा दावा थरूर यांनी केला.
Shashi Tharoor
Shashi Tharoor Esakal

Shashi Tharoor : काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोठं विधान केलं आहे. ''भाजपला मागच्या वेळीपेक्षा कमी जागा मिळतील, त्यांच्या खासदारांची संख्या कमी होईल.'' असा दावा थरूर यांनी केला.

शशी थरुर म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत भाजप सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पुन्हा पुढे येईल. मात्र त्यांच्या जागा लक्षणीयरित्या कमी होतील. राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात NDA मधील घटकपक्षांचा भाजपवरुन विश्वास कमी होईल. भाजपचे घटकपक्ष त्यांचं समर्थन काढून घेवून विरोधी पक्षांना ताकद देण्याची शक्यता नाकारता येत नाहीत.

Shashi Tharoor
Konkana Sen Sharma: 'हिंसा अन् इंटिमेट सीन दाखवण्यामागे तुमचा उद्देश काय हे तर कळायला नको का?'

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, थरुर यांनी सांगितलं की, जर इंडिया आघाडी राज्यांमध्ये जागांचं वाटप योग्य पद्धतीने करत असेल तर विरोधकांना पराजयापासून दूर ठेवलं जावू शकतं. केरळमध्ये सीपीआय आणि काँग्रेसमधील जागावाटपाचा तिढा सुटणं अवघड आहे.

Shashi Tharoor
रस्त्याच्या कडेला ट्रक लावून नमाज पठण...ट्रॅफिक जाम? चालकाला अटक

२०१९ मध्ये भाजपच्या नेतृ्त्वाखालील एनडीएने ३५३ जागांवर विजय मिळवला होता. आता एनडीएचं लक्ष्य ४०० जागांवर आहे. काँग्रेस आणि अन्य २७ पक्षांनी भाजपला आव्हान देण्यासाठी इंडिया आघाडी स्थापन केली आहे. सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये इंडिया आघाडीच्या जागावाटपावरुन चर्चा सुरु आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com