Shashi Tharoor: नसबंदीची मोहीम अन्यायकारक; काँग्रेस नेते शशी थरूर यांची लेखातून आणीबाणीवर टीका
India Politics: खासदार शशी थरूर यांनी आणीबाणीच्या काळावर टीका करत ती केवळ काळा अध्याय नाही, तर एक धडा असल्याचे म्हटले. त्यांनी संजय गांधींच्या जबरदस्तीच्या नसबंदी मोहिमेवरही तीव्र शब्दांत टीका केली.
नवी दिल्ली: आणीबाणीचा काळ ही केवळ काळा अध्याय म्हणून नाही तर त्यापासून धडा घ्यायला हवा, असे खासदार शशी थरूर यांनी सांगत या काळात राबविलेली नसबंदीची मोहीम ही अन्यायाचे उदाहरण होते, अशा शब्दांत टीका केली.