
Shashi Tharoor: भारतानं आता पाकिस्तानच्या दहशतवादाविरोधात मोठी रणनिती आखली असून नवी मोहिम सुरु करणार आहे. या मोहिमेंतर्गत देशातील सर्व राजकीय दलांची ४० खासदारांची टीम सात गटात विभागून जगातील प्रमुख देशांना भेटी देणार आहेत. विशेष गोष्ट म्हणजे या खास मोहिमेचं नेतृत्व काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांच्याकडं सोपवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर केरळ काँग्रेसनं आनंद व्यक्त केला आहे.