सुट - बुट घालून थरुर वेटरसारखे दिसतात - सुब्रमण्यम स्वामी

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली - काँग्रेस नेते शशी थरुर यांनी पुन्हा एकदा मोदींवर वादग्रस्त वक्तव्य केले. मोदी आपल्या दौऱ्यांमध्ये चित्रविचित्र टोप्या वापरतात परंतु, मुसलमानांची टोपी वापरण्यास नकार देतात, असे थरुर यांनी म्हटले. त्यावर भाजपा नेत्यांनी अक्षेप घेतला असून, सुब्रमण्यम स्वामी यांनी, तुमचे सुट-बुट विचित्र वाटत नाहीत का? त्यात तुम्ही वेटर सारखे दिसता, असे म्हटेल आहे.

'समकालीन भारतात द्वेष, हिंसा आणि असहिष्णुता यांच्याविरुद्ध लढाई', या विषयावर व्याख्यान देताना मोदींबद्दल असे वक्तव्य केले होते. 

नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रियो यांनी देखील थरुर यांचे नाव न घेता, त्यांनी माफी मागावी असे म्हटले आहे. ''नागा संस्कृती समृद्ध आहे. या संस्कृतीच्या टोपी बद्दल सगळ्यांनाच माहित असून, ती मुळीच विचित्र नाही''. त्याला समृद्ध इतिहास असून, आम्हाला आमच्या परंपरांचा अभिमान असल्याचे त्यांनी ट्विट केले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shashi Tharoor, you look like a waiter in suit-boot’: Subramanian Swamy