
Women's Day 2023 : आई काहीही करु शकते! लेकीचे शूज घ्यायला पैसे नव्हते सुरु केली स्वतःची शूज इंडस्ट्री...
Inspirational Women's of India : गरिबीमुळे त्यांनाआपल्या मुलीसाठी चपला विकत घेता आली नाही, म्हणून त्यांनी जुन्या बुटांच्या सोलवर लोकरीपासून नवीन शूज विणून शूज उद्योग उभारला आणि त्यासाठी त्यांना पद्मश्री मिळाला.
आई आपल्या लेकरासाठी काहीही करु शकते. मणिपूरमधील पद्मश्री उद्योगपती मुक्तामणी मोइरंगथेम यांची ही कहाणी. सुमारे तीन दशकांपूर्वी, १९८९ पर्यंत, त्यांच्या परिसरातील इतर महिलांप्रमाणे, त्या आपल्या मुलांसाठी घरी लोकरीचे मोजे आणि मफलर विणायच्या, शेतात काम करायच्या आणि संध्याकाळी भाजी विकायच्या.

त्या काही अतिरिक्त पैसे मिळविण्यासाठी रात्री पिशव्या आणि हेअरबँड विणत असे. असे असूनही त्यांची आर्थिक अवस्था अतिशय बिकट होती, कसा तरी घरखर्च चालत होता. एकदा त्यांच्या मुलीचे शूज जीर्ण झाले, तेव्हा त्यांनी बुटाच्या वरचा भाग काढून टाकला आणि सोलवर लोकरीचा शूज विणला. त्यांच्या मुलीच्या शाळेतील शिक्षिकेला हे शूज इतके आवडले की त्यांनी तिच्या मुलीसाठीही ऑर्डर केले.
आणि फक्त ५ दिवसांत १५०० शूजची विक्री केली
काही वेळाने गस्त घालत असताना तिथल्या तैनात असलेल्या लष्कराच्या जवानांना मुलीच्या पायात विणलेले बूट दिसले आणि त्यांनीही आपल्या मुलांसाठी हे शूज मागवले आणि इथूनच हे हाताने विणलेले बूट मणिपूरच्या बाहेर गेले.
काम वाढत असल्याचे पाहून मुक्तामणी यांनी १९९० मध्ये 'मुक्ता शूज इंडस्ट्री' ही स्वतःची कंपनी सुरू केली आणि प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे झालेल्या जत्रेत अवघ्या पाच दिवसांत १५०० शूज विकले आणि आता त्यांची उत्पादने जपान, रशिया, सिंगापूर आणि देशांत निर्यात केली जातात.
आज त्यांच्या हाताखाली भरपूर लोकं काम करता आहेत, त्यापैकी बहुतेक महिला आहेत. त्यांना एक प्रशिक्षण केंद्र उघडायचे आहे जिथे तरुणांना ही कला शिकवून स्वयंरोजगाराशी जोडता येईल आणि ही कला लुप्त होण्यापासून वाचवता येईल.
मुक्तामणी यांना त्यांच्या याच विचारसरणीसाठी आणि गरीब महिलांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी ओळखले गेले आणि त्यांच्या कलेसाठी २०२२ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.