
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांनी वयाच्या ८१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या एक महिन्यापासून ते लाईफ सपोर्ट सिस्टीमवर होते आणि त्यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे पुत्र आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी याची पुष्टी केली आहे.