पंजाबचे माजी CM बादल यांच्या ताफ्यावर फायरींग; अकाली दलाचा काँग्रेसवर आरोप

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 2 February 2021

पंजाब राज्यातील जलालाबादमध्ये सुखबीर सिंह बादल यांच्या ताफ्यावर हल्ला झाला आहे.

चंदीगढ : पंजाब राज्यातील जलालाबादमध्ये सुखबीर सिंह बादल यांच्या ताफ्यावर हल्ला झाला आहे. बादल यांच्या ताफ्यावर गोळीबाराची घटना घडली आहे. हा हल्ला तेंव्हा झाला आहे, जेंव्हा ते आपल्या मतदरासंघात परतत होते. या ताफ्यातील एका वाहनामध्ये सुखबीर सिंह बादल होते. सुखबीर सिंह मोठ्या काळापासून पंजाब राज्याचे मुख्यमंत्री होते. 

या घटनेवरुन आता अकाली दल आणि काँग्रेस पक्षादरम्यान आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. पोलिसांचा पाठिंबा असलेल्या काँग्रेसच्या गुंडांनी आज शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला, असा आरोप शिरोमणी अकाली दलाने केला आहे. तसेच बादल यांच्या संरक्षणार्थ धावलेले तीन पक्ष कार्यकर्ते गोळी लागून जखमी झाले आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

हेही वाचा - 'राम मंदिराच्या नावे पैसे गोळा करुन दारू पितात'; काँग्रेस आमदाराचा भाजप नेत्यांवर आरोप

सुखबीर सिंह यांना कसल्याही प्रकारची इजा या हल्ल्यामध्ये झालेली नाहीये. तसेच त्यांना तातडीने सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. अकाली दलाचं म्हणणं आहे की या हल्ल्यामध्ये त्यांचे काही लोक जखमी झाले आहेत. घटनास्थळी सध्या पोलिस पोहोचली असून पुढील तपास सुरु आहे. 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiromani Akali Dal president Sukhbir Singh Badals vehicle attacked in Jalalabad Punjab