esakal | अकाली दल आंदोलन: सुखबीर सिंह बादल पोलिसांच्या ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

अकाली दल आंदोलन: सुखबीर सिंह बादल पोलिसांच्या ताब्यात

अकाली दल आंदोलन: सुखबीर सिंह बादल पोलिसांच्या ताब्यात

sakal_logo
By
विनायक होगाडे

चंदिगढ: पंजाब सरकारविरोधात शिरोमणी अकाली दल आक्रमक झाले आहे. शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी सिसवान येथे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या घराबाहेर आंदोलन छेडलं आहे. राज्यातील सुरक्षा दलांनी पाण्याचे तीव्र फवाऱ्यांच्या मारा करुन या आंदोलकांची पांगापांग करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल यांना पंजाब पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

हेही वाचा: राम जन्मभूमी खरेदीत घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या खासदाराच्या घरावर हल्ला

कोरोना लसीचा साठा खासगी रुग्णांलयांना विकल्याचा आरोप सरकारवर करण्यात येतो आहे. यांसदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री बलबीर सिंह यांना हटवण्याची मागणी या आंदोलकांची आहे. हे आंदोलन शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल यांच्या नेतृत्वात सुरु आहे.

यावेळी त्यांनी म्हटलंय की, जर हे आंदोलन चिघळलं तर मुख्यमंत्र्यांनी सगळी शक्ती पणाला लावली तरी हे आंदोलन थांबवता येणार नाही. लसीकरणामध्ये घोटाळा झाला आहे. तसेच फतेह किटमध्ये आणि शेड्यूल कास्टच्या स्कॉलरशीपमध्येही घोटाळा झाला आहे. शेतकऱ्यांची जमिन बळकावली जात असल्याचा आरोप देखील सुखबीर सिंह बादल यांनी केला आहे.

loading image
go to top