Women's Reservation Bill
esakal
शिरोमणी अकाली दलाने महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा दिला आहे. हे विधेयक तातडीने लागू करावं, अशी मागणी पक्षाध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांनी केली आहे. सुखबीर सिंह बादल यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर आज पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. संबंधित विधेयकाला भाजपला एका मोठ्या पक्षाचा पाठिंबा मिळाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.