शिवसेना म्हणते, 'सुप्रीम कोर्टातील सुनावणीत मुकूल रोहतगींची घुसखोरी?'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधी विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी दाखललेल्या याचिकेवर आज, सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. त्यात अटर्नी जनरल मुकूल रोहतगी, यांनी सरकारची बाजू मांडली. पण, सुनावणीत रोहतगी यांनी घुसखोरी केल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी केलाय.

नवी दिल्ली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधी विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी दाखललेल्या याचिकेवर आज, सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. त्यात अटर्नी जनरल मुकूल रोहतगी, यांनी सरकारची बाजू मांडली. पण, सुनावणीत रोहतगी यांनी घुसखोरी केल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी केलाय. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

रोहतगींची घुसखोरी
राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी घेतलेल्या निर्णयांच्या आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले आहे. शनिवारी रात्री उशिरा दोन्ही पक्षांनी याविरोधात याचिका दाखल केली. त्यावर आज सकाळी साडे अकरा वाजता सुनावणी झाली. या सुनावणीत अटर्नी जनरल मुकूल रोहतगी यांनी सरकारच्या बाजूने युक्तीवाद केला. अपक्ष आमदार आणि काही भाजप नेत्यांच्या वतीने बाजू मांडत असल्याचं त्यांनी कोर्टात सांगितलं. पण, त्यांच्या युक्तीवादावर शिवसेनेनं आक्षेप घेतलाय. याबाबत गजानन किर्तीकर म्हणाले, 'भाजपच्या मित्रपक्षांकडून आल्याचं रोहतगी यांनी कोर्टात सांगितलं. पण, त्यांनी घुसखोरी केल्याचं आमचं म्हणणं आहे.'

पवार साहेबांनी अजून काय करायला हवे, असे म्हणतच जितेंद्र आव्हाडांचे डोळे पाणावले...

आमच्याकडे 41 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र 
किर्तीकर म्हणाले, 'आम्ही कोर्टात 24 तासांत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती. राष्ट्रवादीच्या 41 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र आमच्याकडं आहे. फडवणीस आणि अजित पवार यांनी स्थापन केलेलं सरकार हे चुकीच्या पद्धतीनं स्थापन झालेलं सरकार आहे. त्यामुळचं काल आम्ही उशिरा याचिका दाखल केली. कोर्टानं ती दाखल करून घेतली आणि त्यावर सुनावणीही घेतली. आम्ही कोर्टाचे आभारी आहोत. उद्या कोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे. आमचा आदरणीय कोर्टावर पूर्ण विश्वास आहे.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shiv sena leader gajanan kirtikar statement on mukul rohatgi supreme court hearing