

The Supreme Court will begin final hearings on the Shiv Sena merger dispute on December 8.
esakal
नवी दिल्ली,: शिवसेनेच्या (यूबीटी) सहा खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत केलेल्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर येत्या आठ डिसेंबरपासून अंतिम सुनावणी घेतली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले. खासदारांच्या गटाच्या विलीनीकरणाला लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली होती. त्याला आक्षेप घेत खासदार अरविंद सावंत यांनी याचिका दाखल केली होती. या प्रकरणी नोटीस बजावूनही लोकसभा अध्यक्षांतर्फे म्हणणे मांडले नसल्याचा आक्षेप न्या. पी. एस. नरसिंहा आणि न्या. आलोक आराधे यांच्या खंडपीठाने नोंदवला.