ShivSena Symbol: शिंदे गटाच्या 7 जिल्हा प्रमुखांवर ठाकरे गटाचा आक्षेप; कागदपत्रातील त्रुटी काढल्या शोधून?

हा आक्षेप खरा ठरला तर शिंदे गट अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
uddhav thackeray and eknath shinde
uddhav thackeray and eknath shindeesakal

मुंबई : शिवसेनेचं पक्षचिन्ह धनुष्यबाण नक्की कोणाचं यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुनावणी झाली. यावेळी ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही गटांकडून युक्तीवाद करण्यात आला. यामध्ये ठाकरे गटानं शिंदे गटाच्या 7 जिल्हा प्रमुखांवर आक्षेप नोंदवला. जर हा आक्षेप खरा ठरला तर शिंदे गट अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Shiv Sena Symbol Thackeray group objects to Shinde group 7 district chiefs)

uddhav thackeray and eknath shinde
Shivsena Symbol: निवडणूक आयोगाच्या यादीत नसलेलं चिन्ह उद्धव ठाकरेंना कसं मिळेल?

सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदे गटाच्या 7 जिल्हाप्रमुखांवर ठाकरे गटानं आक्षेप घेतला आहे. शिंदेंच्या सात जिल्हा प्रमुखांच्या कागदपत्रांमध्ये त्रृटी आहेत असा दावा ठाकरे गटानं निवडणूक आयोगासमोर केला. शिंदे गटाचे वकील अॅड. महेश जेठमलानी यांनी निवडणूक आयोगासमोर शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये कोणत्याही तृटी नसल्याचं सांगितलं. पण ठाकरे गटानं या तृटी शोधून काढल्या आहेत.

uddhav thackeray and eknath shinde
Viral Video: धक्कादायक! बंगळुरुमध्ये तरुणानं वृद्ध व्यक्तीला दुचाकीसह नेलं फरफटत

'या' जिल्हा प्रमुखांवर घेतला आक्षेप

ज्या लोकांवर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. त्यामध्ये विजय चौगुले, राजाभाई केणी, चंद्रकांत रघुवंशी, किरसिंग वसावे यांच्यासह आणखी तीन शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखांवर आक्षेप घेण्यात आला आहे. पण यावर शिंदे गटाच्या कुठल्याही नेत्यानं अद्याप भाष्य केलेलं नाही. पण ठाकरे गटाचे आक्षेप खरे असतील तर त्यामुळं शिंदे गट अडचणीत येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...

नेमका आक्षेप काय?

यामध्ये विजय चौगुले हे मूळ शिवसेनेत होते तेव्हा त्यांच्याकडे माजी विरोधीपक्ष नेतेपद होतं पण शिंदे गटानं त्यांना ठाण्याचं जिल्हाप्रमुखपद देण्यात आलं. त्यानंतर राजाभाई केणी हे तालुकाप्रमुख पदावर असताना त्यांना रायगड जिल्हा प्रमुख दाखवण्यात आलं आहे. चंद्रकांत रघुवंशी यांना नंदुरबारचे जिल्हाप्रमुख दाखवण्यात आलं आहे. किरसिंग वसावे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांना नंदुरबारचा जिल्हा प्रमुख दाखवण्यात आलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com