धक्कादायक! बंगळुरुमध्ये तरुणानं वृद्ध व्यक्तीला दुचाकीसह नेलं फरफटत : Viral Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video: धक्कादायक! बंगळुरुमध्ये तरुणानं वृद्ध व्यक्तीला दुचाकीसह नेलं फरफटत

बंगळुरु : दिल्लीत तरुणीला कारसह १३ किमी फरफटत नेल्याची कांझावला घटना ताजी असतानाच बंगळुरुमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. एका तरुणानं एका मध्यमवयीन व्यक्तीला दुचाकीसह फरफटत नेल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (Viral Video Man being dragged behind a scooter on Bengaluru Magadi road)

बंगळुरु पोलिसांच्या माहितीनुसार, दुचाकीसह एका व्यक्तीला फरफटत नेल्याच्या घटनेचा व्हिडिओ खरा आहे. यामधील पीडित व्यक्तीला सध्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ज्या दुचाकी चालक तरुणानं हा प्रकार केला आहे त्याला पीएस गोविंदराज नगर इथून ताब्यात घेण्यात आलं आहे.