Shivaji Maharaj forts included in UNESCO world heritage list 2025 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत झाला आहे. 'भारताचे मराठा साम्राज्यातील लष्करी बांधणीचे गडकिल्ले' या शीर्षकाखाली २०२४-२५ च्या यादीत हा समावेश करण्यात आला आहे. या निर्णयानंतर आता विविध प्रतिक्रिया पुढे येत आहेत. अशातच पंतप्रधान मोदींनीही सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भात आनंद व्यक्त केला आहे.