

Shivalay Park in Prayagraj features replicas of the 12 Jyotirlingas and major Shiva temples on an India map theme for just Rs 50.
Sakal
महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर प्रयागराज शहरात विविध विकासकामे करण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रयागराज महापालिकेने अरैल घाट परिसरात आकर्षक 'शिवालय पार्क' विकसित केला आहे. या उद्यानाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे भारताच्या नकाशाच्या धर्तीवर देशातील प्रमुख शिवमंदिरांच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांना एकाच ठिकाणी देशभरातील महत्त्वाच्या शिवमंदिरांचे दर्शन घेण्याची संधी मिळते. या प्रकल्पाच्या देखभालीची जबाबदारी पुढील तीन वर्षे उद्यान उभारणाऱ्या संस्थेकडेच असणार आहे.