विलासरावांचे सरकार वाचविणारे शिवकुमार आता काँग्रेसला तारतील?

DK-Shiva-Kumar
DK-Shiva-Kumar

सध्या कोणतीही वृत्तवाहिनी पाहिली किंवा माध्यमांच्या वेबसाईटवर गेलं, की एक विषय सतत झळकत आहे... तो म्हणजे कर्नाटक सरकारचं काय होणार! आणि त्यात एक नाव प्रामुख्याने घेतले जात आहे ते डी.के.शिवकुमार यांचं. कोण आहेत हे डी.के.शिवकुमार? 

डी.के.शिवकुमार म्हणजे कर्नाटक काँग्रेसमधील हुकूमी एक्का आहे. सुरवातीपासून त्यांची ओळख 'लढवय्या' म्हणूनच आहे. वयाच्या 25 व्या वर्षी शिवकुमार यांनी एच. डी. देवेगौडा यांना पराभूत करण्याची किमया केली होती. या कामगिरीचे बक्षीस म्हणून त्यांना मंत्रिमंडळात स्थानही मिळाले होते. कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनाही शिवकुमार यांनी 1999 मध्ये पराभूत केले होते. या कालावधीमध्ये शिवकुमार यांचे राजकीय वजन निर्माण झाले होते. 

महाराष्ट्रातील विलासराव देशमुख यांचे सरकार वाचविण्यासाठी 2002 मध्ये शिवकुमार यांनी आक्रमक आणि अचूक हालचाली केल्या होत्या. त्या यशानंतर कुमारस्वामी यांची गांधी कुटुंबीयांशी जवळीक वाढली. हळूहळू त्यांची ओळख 'संकटमोचक' अशी निर्माण झाली. 2009 मध्ये शिवकुमार यांना कर्नाटक काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्षपद सोपविण्यात आले होते. तेव्हापासून शिवकुमार हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. 

शिवकुमार हे कर्नाटकमधील सर्वांत श्रीमंत नेत्यांपैकी एक आहेत. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी स्वत:ची संपत्ती एकूण 840 कोटी रुपयांची असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. काही गैरव्यवहारांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचेही आरोप झाले आहेत. गरीब आणि बेघरांसाठी घरे बांधण्यासाठी राखीव असलेल्या जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप शिवकुमार यांच्यावर 2015 मध्ये झाला होता. तसेच, कर्नाटकातील काही भागांमध्ये बेकायदेशीर खाणींच्या प्रकरणातही शिवकुमार यांना उच्च न्यायालयाने नोटीस बजाविली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com