नितीन गडकरी कल्पवृक्ष, मागितल्या पेक्षा जास्त देतात; मुख्यमंत्र्यांचे स्तुतिसुमने

देश महाआर्थिक शक्ती बनण्यासाठी आम्ही काम करीत आहो
Nitin Gadkari Latest News
Nitin Gadkari Latest NewsNitin Gadkari Latest News

इंदूर : २०१४ मध्ये रस्त्यांची अवस्था खूप वाईट होती. मात्र, परिस्थिती बदलेल असे आश्वासन नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिले होते. त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले. नितीन गडकरी हे कल्पवृक्ष आहे. ते कधीही बजेटचे कारण सांगत नाही. ते मागितल्यापेक्षा जास्त देतात, असे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) म्हणाले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांनी मध्य प्रदेशातील इंदूर ब्रिलियंट कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ११९ किमी लांबीच्या रस्ते प्रकल्पाची पायाभरणी केली आणि साइड सुविधांचे उद्घाटन केले. नितीन गडकरी व शिवराज सिंह चौहान यांनी रिमोटचे बटण दाबून २,३०० कोटींच्या रस्ते प्रकल्पांची भेट दिली.

Nitin Gadkari Latest News
Fire In Hospital : जबलपूरच्या खाजगी रुग्णालयात भीषण आग; १० जणांचा मृत्यू

मी अनेकदा इंदूरला (Indore) येतो आणि प्रत्येक वेळी काहीतरी नवीन समोर येते. देश महाआर्थिक शक्ती बनण्यासाठी आम्ही काम करीत आहो. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. स्वराज्य सार्वभौम करणे हे आपल्या सर्वांचे ध्येय आहे. मी एक छोटा कार्यकर्ता आहे. मी तुम्हाला तुमचेच देत आहे, असे नितीन गडकरी म्हणाले. नितीन गडकरी यांच्या मदतीने राज्यात सुमारे अडीच लाख कोटींची कामे सुरू आहे.

लोकसभेत अर्थसंकल्पावर चर्चा करताना नितीन गडकरी यांचे म्हणणे ऐकण्यासाठी पक्षासह विरोधी पक्ष उपस्थित होता. दोन वर्षांत नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी इंदूरला ५,८०० कोटींची विकासकामे केली. २,३०० कोटींहून अधिक खर्च करून बांधण्यात येणारे हे रस्ते प्रकल्प राज्यातील पायाभूत सुविधांचे चित्र बदलतील. रस्त्यांचे जाळे मजबूत झाल्याने उद्योगांच्या विकासाला नवी दिशा मिळेल आणि उद्योजक राज्यात अधिकाधिक गुंतवणूक करण्यासाठी पुढे येतील, असे खासदार शंकर लालवानी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com