शिवराजसिंह मंत्रिमंडळाचा आज विस्तार शक्य

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 30 जून 2020

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज दिल्ली दौरा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, खासदार ज्योतिरादित्य शिंदे, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी गाठीभेटी घेतल्या.

नवी दिल्ली - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज दिल्ली दौरा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, खासदार ज्योतिरादित्य शिंदे, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी गाठीभेटी घेतल्या. चौहान आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज (मंगळवारी) करणार असल्याचे निश्चित मानले जाते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

काँग्रेसपासून दूर झालेले शिंदे यांच्या गटाच्या ८ ते ९ आमदारांसह किमान दोन डझन मंत्री उद्या शपथ घेतील, अशी चिन्हे आहेत. या राज्यात तीन महिन्यांपूर्वी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि शिंदे आपल्या गटासह भाजपमध्ये गेल्याने वर्षभरापूर्वीचे कमलनाथ यांचे सरकार कोसळले. नंतर भाजपने येथे सरकार बनविले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

शिंदे गटाच्या नऊ जणांचा समावेश
शिंदे यांनी चौहान यांच्याकडे ३० लाख रुपयांचा चेक कोरोना मुख्यमंत्री मदत निधीला दिला. दोन्ही नेत्यांमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही चर्चा झाली. मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाचे आठ ते नऊ आमदार निश्चित मानले जातात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivraj singh chouhan cabinet expansion possible today