Video : अपघात बघून थांबला मुख्यमंत्र्यांचा ताफा; अपघातग्रस्तांना केली अशी मदत

Video : अपघात बघून थांबला मुख्यमंत्र्यांचा ताफा; अपघातग्रस्तांना केली अशी मदत

भोपाळः राजकीय नेता म्हणून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांची एक वेगळी ओळख आहे. त्यांच्या संवेदनशीलतेबद्दल नेहमी चर्चा केली जाते. आज एक अपघात झाला अन् त्यांची संवेदनशीलता पुन्हा दिसून आली.

शनिवारी मुख्यमंत्री परशुराम जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी गुफा मंदिराकडे जात होते. त्याचवेळी त्यांना रस्त्यावर एक अपघातग्रस्त कार दिसली. ही दुर्घटना काही वेळापूर्वीच झाली होती.

Video : अपघात बघून थांबला मुख्यमंत्र्यांचा ताफा; अपघातग्रस्तांना केली अशी मदत
Atiq Ahmed Shot dead : अतिक करणार होता अनेक खळबजनक गौप्यस्फोट, विरोधकांनीच...; मंत्र्यांचा दावा

घटनास्थळाजवळ मुख्यमंत्र्यांचा ताफा पोहोचला त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना थांबायला सांगितलं. स्वतः शिवराज सिंह गाडीतून उतरले आणि जखमींशी संवाद साधला. उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी निर्देश देऊन जखमींना तातडीने उपचारासाठी रवाना केलं.

भोपाळच्या व्हीआयपी रस्त्यावर ही घटना घडली. पोलिसांच्या माहितीनुसार काही तरुण भरधाव वेगात कार चालवत होते. वेगामुळे कारवरचं त्यांचं नियंत्रण सुटलं अन् कारने पलटी खाल्ली. वेग जास्त असल्यामुळे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला कार जावून पलटली.

अपघातामध्ये जखमी तरुणांची प्रकृती स्थिर आहे. मुख्यमंत्री तेथून जाताच पोलिस अधिकाऱ्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात हलवलं. मुख्यमंत्री परशुराम जयंतीच्या कार्यक्रमाला निघाले असतांना ही घटना घडली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com