
Love jihad : ‘लव्ह जिहाद’चा कायदा कठोर करू; शिवराजसिंह चौहान
इंदूर : आदिवासी महिलांशी विवाह करून त्यांची जमीन हडप करण्याच्या घटना रोखण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेला ‘लव्ह जिहाद’विरुद्धचा कायदा अधिक कठोर करण्यात येईल, असे आश्वासन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिले. आदिवासी स्वातंत्र्यसैनिक तंट्या भिल्ल यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदिवासींनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. मध्य प्रदेश धार्मिक स्वातंत्र्य कायदा, २०२१ नुसार सक्तीने, आमिषाने किंवा विवाहाचे वचन देऊन धर्मांतर करण्यास मनाई करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतींना महसूलचे रेकॉर्ड उपलब्ध होत नसल्याने अनेक प्रभावशाली लोक आपल्या नोकरांच्या नावाने आदिवासींच्या प्रदेशात जमिनी खरेदी करतात. हे तपासण्यासाठी जमिनीची कागदपत्रे ग्रामसभेत ठेवण्यात येतील. आदिवासींचे स्थलांतर थांबविण्यासाठी त्याना रोजगार उपलब्ध करून देण्याची योजना सरकार तयार करत आहे.
- शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री, मध्य प्रदेश