शिवराजसिंह चौव्हान यांनी 'पीए'च्या हातात दिला बूट

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 जानेवारी 2017

इंदोर- मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौव्हान यांनी स्वीय सहाय्यकाच्या (पीए) हातात बुट दिल्याचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. यामुळे चौव्हाण चर्चेत आले आहेत.

भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी पन्ना जिल्ह्यामध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चौव्हान हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. घटनास्थळी गेल्यानंतर चौव्हान यांनी बूट काढला होता. त्यांच्या स्वीय सहाय्यकाने तो बूट हातात घेऊन त्यांच्यासोबत चालत गेल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. संबंधित व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.

उज्जैन जिल्ह्याचे भाजपाध्यक्ष श्याम बन्सल म्हणाले, चौव्हान कार्यक्रमाला उपस्थित राहण्यापूर्वी शेजारी असलेल्या मंदिरात दर्शनासाठी गेले होते. यावेळी एका कार्यकर्त्याने बूट हातात उचलून घेतला होता.

दरम्यान, ऑगस्ट 2016 मध्येही अशीच घटना घडली होती. त्यावेळीही चौव्हान चर्चेत आले होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivraj Singh Chouhan's aide caught on camera carrying his shoes