'शिवराजसिंह चौहान पंडित नेहरूंच्या पायधूळी समानही नाहीत'

वृत्तसंस्था
Monday, 12 August 2019

भाजप नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना गुन्हेगार म्हटल्याने नवा वादंग निर्माण झाला होता.

भोपाळ : ''शिवराजसिंह चौहान हे जवाहरलाल नेहरू यांच्या पायाची धूळही नाहीत. असे वक्तव्य करताना त्यांना लाज वाटायला हवी होती,'' असे मत काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केले. पत्रकारांशी संवाद साधताना या प्रकरणी त्यांनी आपले मत व्यक्त केले. 

भाजप नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना गुन्हेगार म्हटल्याने नवा वादंग निर्माण झाला होता. ते काल (ता.11) भुवनेश्वरमध्ये बोलत होते. त्यावेळी त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू अपराधी होते, असे वक्तव्य केले होते.  

दुसरीकडे, मध्य प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री कमल नाथ यांनी ट्विटवरुन आपले मत व्यक्त करताना चौहान यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. “देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु, ज्यांना आधुनिक भारताचे निर्माते म्हटले जाते, ज्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून संघर्ष केला, ज्यांनी देशहितासाठी केलेल्या कामामुळे कायमच त्यांचे योगदान आठवणीत राहिलं असे आहे. त्यांच्या मृत्यूनंतर 55 वर्षांनी आज त्यांचा उल्लेख गुन्हेगार असा करणे खूपच आक्षेपार्ह आणि निंदनीय आहे,” असे मत कमलनाथ यांनी व्यक्त केले.

- जवाहरलाल नेहरू होते 'गुन्हेगार'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ShivrajSingh Chouhan cant equal dust of Pandit Nehrus feet says Digvijay Singh