EC केंद्राच्या अखत्यारित, त्यामुळे पुढे काय होणार हे स्पष्ट; शिवसेनेची प्रतिक्रिया

Uddhav Thackeray and Eknath Shinde
Uddhav Thackeray and Eknath ShindeSakal

नवी दिल्ली - निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला कोणतीही स्थगिती नसल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे निवडणूक आयोग पुढील कार्यवाही सुरू करू शकणार आहे. शिवाय शिवसेनेचं चिन्ह आणि शिवसेना कोणाची याचा निर्णय आता निवडणूक आयोग घेऊ शकणार आहे. यावर आता शिवसेनेची प्रतिक्रिया आली आहे. (Shinde-Thackeray Hearing news in Marathi)

Uddhav Thackeray and Eknath Shinde
ShivSena : शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निर्णय घेण्यास निवडणूक आयोग मोकळं!

यावर अनिल देसाई म्हणाले की, हा काहीही धक्का नाही. निवडणूक आयोगाला घटनेने अधिकार दिले आहेत. योग्य पद्धतीने युक्तीवाद झाला आहे. ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाला हवं आहे, ते आम्ही पुरवणार आहोत. त्यासाठी आमची तयारी आहे.

दुसरीकडे शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे म्हणाल्या की, तूर्तास तरी कोर्टातील युक्तीवादाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे. जेकाही निर्णय येणार होईल, तो पुढील काळात पायंडा ठरू शकतो. निकाल अजून आलेला नाही. तूर्तास तरी निवडणूक आयोगाला निर्णय घेण्यास मोकळं केलं आहे. मात्र निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या अखत्यारित येतो, त्यामुळे पुढं काही होईल, याचा अंदाज लावणे कठीण राहिलं नाही. मात्र तरी देखील आम्ही आमची बाजू लढू, असंही कायंदे यांनी म्हटलं.

दुसरीकडे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं की, आम्हाला आता घटनापीठाकडून अपेक्षा आहे. शिवाय निवडणुक आयोगाला आम्ही संपूर्ण माहिती पुरवणार असून निवडणूक आयोगावर देखील आमचा विश्वास असल्याचं म्हटलं. यावेळी ते नाराज दिसून येत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com