esakal | ... त्यासाठी महाराष्ट्रातील गृहखातं सक्षम - संजय राऊत
sakal

बोलून बातमी शोधा

... त्यासाठी महाराष्ट्रातील गृहखातं सक्षम - संजय राऊत

अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या गाडीपासून सुरु झालेलं प्रकरण सचिन वाझे, फोन टॅपिंग, गृहमंत्र्यांवर आरोप असं चांगलेच गाजतेय.

... त्यासाठी महाराष्ट्रातील गृहखातं सक्षम - संजय राऊत

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. राज्यातील विरोधी पक्षानं महाविकास आघाडी सरकाराला अडचणीत टाकण्यासाठी सर्वस्वी प्रयत्न करत आहेत. अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या गाडीपासून सुरु झालेलं प्रकरण सचिन वाझे, फोन टॅपिंग, गृहमंत्र्यांवर आरोप असं चांगलेच गाजतेय. गेल्या महिनाभरापासून राज्यकीय वातावरण ढवळून निघालं आहे. विरोधकांच्या आरोपांवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खास आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत भाजापावर टीकास्त्र सोडलं आहे. काही चुकीचं झालं असेल तर त्यासाठी महाराष्ट्रातील गृहखातं सक्षम आहे, त्यासाठी केंद्रात जायची गरज नाही. राज्यातील विरोधी पक्षनेते महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून आलेत. त्यांनी त्यांच्याकडील सगळा डाटा घेऊन मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन चर्चा करायला हवी होती. देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात दिलेल्या अहवालात दम नसल्यामुळेच ते दिल्लीत पोहचले, असं यावेळी संजय राऊत म्हणाले.  अशा प्रकारचे भिजलेले फटाके वारंवार वात लावून फोडण्याची दिल्लीला सवय आहे. आम्ही याकडे गंमत म्हणून पाहत आहोत. पुढचा सिनेमा कोणता तयार करतायेत याकडे आम्ही पाहतोय, असंही राऊत म्हणाले.

देवेंद्र फडणवीसजी जो काही बॉम्ब घेऊन दिल्लीमध्ये आले होते तो भिजलेला लवंगी फटाका आहे. त्या फटाक्याला वातसुद्धा नव्हती. आम्ही दिल्लीत कुठे स्फोट झाला, महाराष्ट्रात काही पडसाद उमटतात का पाहत होतो. पण तसं काही दिसलेच नाही. बंगालप्रमाणे महाराष्ट्र आणि दिल्लीत ‘खेला होबे’ सुरु आहे. यामुळे लोकांचं चांगलं मनोरंजन होत असून त्यासाठी कोणता मनोरंजन टॅक्सही भरायची गरज नाही,” असा सणसणीत टोला संजय राऊत यांनी लगावला.

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे - 

  • संवैधानिक पदाचा कोणीही दुरुपयोग करु नये
  • कोश्यारी आज राज्याचे राज्यपाल आहेत. कालपर्यंत संघाचे सदस्य होते.
  • राज्यपाल आमच्या १२ सदस्यांना मंजुरी का देत नाहीत?
  • भाजपाच्या दबामुळे आमच्या १२ आमदारांच्या सदस्यांना राज्यपाल मंजुरी देत नाहीत. 
  • विरोधक कोणता चित्रपट बनवत आहेत, याकडे आमचं लक्ष आहे. 
  • योग्यवेळी मुख्यमंत्री समोर येतील
  • फोन टॅपिंग अहवालात काडीचा दम नाही
  • महाराष्ट्रातील नेत्यानी दिल्लीत यावं. दिल्लीवर महाराष्ट्राचा प्रभाव असायला हवा आणि त्यादृष्टीने विरोधी पक्षनेते येत असतील तर त्यांचं स्वागत करायला हवं.
     
loading image