
एका महिलेने तिच्या पतीला त्याची किडनी विकण्यास भाग पाडले आणि नंतर ते पैसे घेऊन प्रियकरासोबत पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेने आपल्या पतीला मुलीच्या शिक्षणासाठी किडनी विकणे योग्य आहे हे पटवून दिले अन् त्याने तिच्यावर विश्वास ठेवून १० लाखांत किडनी विकली. महिलेने ते पैसे स्वत:कडे घेतले अन् रात्रीच प्रियकरासोबत फरार झाली. पतीने महिलेविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पश्चिम बंगालमधील हावडामध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे.