esakal | पूर्व लडाखमध्ये चीनची घुसखोरी; सीमेवरील कुरापती वाढल्या 
sakal

बोलून बातमी शोधा

पूर्व लडाखमध्ये चीनची घुसखोरी; सीमेवरील कुरापती वाढल्या 

भारतीय लष्कराने मात्र यावर अद्याप भाष्य केलेले नाही.गलवान खोऱ्यात मोठ्या संख्येने चिनी लष्कर तैनात झाल्याचे समजते. खबरदारीचा उपाय भारताने देखील या भागातील आपले लष्करी बळ वाढविले आहे. 

पूर्व लडाखमध्ये चीनची घुसखोरी; सीमेवरील कुरापती वाढल्या 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय सीमेवरील चीनच्या कुरापती वाढत चालल्या असून चीनचे लष्कर पूर्व लडाख भागात तीन किलोमीटरपर्यंत आत आले होते, गलवान खोऱ्यात चीनकडून ही घुसखोरी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान भारतीय लष्कराने मात्र यावर अद्याप भाष्य केलेले नाही. गलवान खोऱ्यात मोठ्या संख्येने चिनी लष्कर तैनात झाल्याचे समजते. खबरदारीचा उपाय भारताने देखील या भागातील आपले लष्करी बळ वाढविले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान चीनकडून मात्र सीमेचे उल्लंघन झाल्याची बाब फेटाळून लावण्यात आली आहे. या भागातील सीमारेषेबाबत उभय देशांत मतभेद आहेत. दोन्ही देशांनी परस्पर त्यांच्या सीमारेषांची आखणी केली असून याधीही चिनी सैन्याने याच भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. पॅंगॉन्ग त्सो आणि गलवान खोऱयावर चीनचे पूर्वीपासून लक्ष असून या भागातील चिनी सैन्याचा हस्तक्षेप वाढत चालला आहे. याच भागात चीनने मागील दोन आठवड्यांत शंभर तंबू ठोकले असून बंकरच्या उभारणीसाठी लागणारे साहित्य देखील या भागांत आणण्यात आले आहे. भारताने मात्र याला कडाडून विरोध केला आहे. दरम्यान चीनसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी मध्यंतरी या भागाला भेट दिली होती. 

सैन्य आमने सामने 
पाच मे रोजी याच भागांत उभय देशाचे सैन्य आमनेसामने आले होते. यावेळी दोन गटांत जोरदार बाचाबाची देखील झाली होती. याचे पर्यावसन पुढे हाणामारीत झाले होते. यावर तोडगा काढण्यासाठी उभय देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांत चर्चा ही झाली होती. हा वाद निवळतो नाही तोच ९ मे रोजी उत्तर सिक्कीममध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती. या वादाच्या पार्श्वभूमीवर एकाच आठवड्यात दोन्ही देशांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पाच बैठका पार पडल्या होत्या. यावेळी भारताची बाजू मांडताना लष्करी अधिकाऱ्यांनी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या घुसखोरीला आक्षेप घेतला होता. 

loading image
go to top