Mobile Blast: हृदयद्रावक! मोबाईलने घेतला आठ महिन्यांच्या चिमुकलीचा जीव

अंगाला थरकाप सोडणारी ही घटना आहे, मोबाईलने अवघ्या ८ महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेतला
8 month baby died due to mobile blast
8 month baby died due to mobile blastesakal

bareilly: मोबाईल फोन वापरासंदर्भात शासनाकडून अनेक सूचना दिल्या जातात. विशेषत: फोन चार्जिंग करताना फोनवर बोलू नका अशा सूचना वारंवार सगळीकडे देण्यात येतात. अनेकदा या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने मोबाईलचे स्फोट घडून येतात. अशीच एक अंगाला शहारे सोडणारी एक घटना बरेलीमध्ये घडली आहे. ८ महिन्याच्या चिमुकलीचा मोबाईलचा स्फोट झाल्याने मृत्यू झालाय. (8 month baby died due to mobile blast)

माहितीनुसार, सोलर पॅनलद्वारे मोबाईल चार्ज होत असताना फोनची बॅटरी अति चार्ज होऊन गरम झाली आणि फोनचा स्फोट झाला. फोनचा स्फोट झाल्याने फोनच्या बाजूला असलेली ८ महिन्यांची चिमुकली गंभीररित्या भाजली गेली. कुटुंबियांनी तिला तात्काळ रूग्णालयात नेले परंतु तोवर या चिमुकलीचा मृत्यू झाला होता.

8 month baby died due to mobile blast
Mumbai 1993 Serial Blasts : आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

लावा कंपनीच्या मोबाईलमुळे घडली दुर्दैवी घटना

मोबाईलचा स्फोट होण्याच्या बऱ्याच घटना याआधीही घडल्या आहेत. बरेली मध्ये घडलेली ही घटना लावा कंपनीच्या फोनची असून यासंदर्भात कंपनी चौकशी करणार असल्याचे सांगितल्या जातेय. तसेच पीडित कुटुंबियांना हवी ती मदत करण्याबाबत दिलासाही कंपनीने दिला आहे.

8 month baby died due to mobile blast
Kabul Blast : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील मशिदीत स्फोट, 21 जणांचा मृत्यू; 60 जखमी

का होतात मोबाईलचे ब्लास्ट ?

स्मार्टफोनमध्ये लिथियम आयन बॅटरी वापरली जाते. आणि स्मार्टफोनबाबत बोलायचे झाल्यास स्फोट होण्यास कारणीभूत असलेले सगळ्यात मोठे कारण म्हणजे मोबाईलची बॅटरी. तर काहीवेळा एक्स्टर्नल फोर्समुळेही ब्लास्ट होतो. या चिमुरडीबाबत घडलेल्या घटनेनंतर मात्र बरेली परिसरात सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com