लष्कर, तपाससंस्थांचे बडे अधिकारी रडारवर; पेगॅससबाबत आणखी धक्कादायक खुलासा

Pegasus
PegasusSakal
Updated on

नवी दिल्ली : ‘पेगॅसस’ या स्पायवेअरच्या माध्यमातून झालेल्या पाळतप्रकरणाचे संसदेमध्ये तीव्र पडसाद उमटत असताना याबाबत आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) माजी महासंचालक के.के.शर्मा, सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) वरिष्ठ अधिकारी राजेश्‍वर सिंह, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे माजी सहकारी व्ही.के.जैन, ‘रॉ’मध्ये काम करणारे निवृत्त अधिकारी, पंतप्रधान कार्यालयातील काही कनिष्ठ अधिकारी आणि अन्य दोन लष्करी अधिकारी यांच्या दूरध्वनी क्रमांकांचा ‘एनएसओ’च्या संभाव्य लक्ष्यांच्या यादीत समावेश होता, असा दावा ‘वायर’ या संकेतस्थळाकडून करण्यात आला आहे.

Pegasus
स्विस बँकेतील काळ्या पैशाची माहिती नाही; सरकारची लोकसभेत माहिती

पेगॅससने ५० हजार दूरध्वनी क्रमांकांचा एक डेटाबेस तयार केला होता, त्याच्यामध्ये उपरोक्त अधिकाऱ्यांच्या दूरध्वनी क्रमांकांचा देखील समावेश होता. हीच मंडळी कदाचित पेगॅससचे टार्गेट असावीत अशी शक्यता वर्तविण्यात आली असून विशेष म्हणजे ते एनएसओचे क्लायंट देखील होते. या संदर्भातील माहिती जगभरातील काही बड्या माध्यमांच्या हाती लागली आहे. यामध्ये भारतातील ‘वायर’ या संकेतस्थळाचाही समावेश आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित एका संघटनेच्या कार्यक्रमाला २०१८ मध्ये हजेरी लावल्यानंतर के.के.शर्मा हे ‘एनएसओ’च्या रडार आले होते. संभाव्य पाळत ठेवल्या जाणाऱ्या व्यक्तींच्या यादीमध्ये त्यांच्या नावांचा देखील समावेश होता. शर्मा हे कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर तृणमूलने यावरून टीका करताना त्यांच्या चौकशीची मागणी केली होती.

Pegasus
महाराष्ट्र ठरलं एक कोटींच्यावर दोन्ही डोस देणारं पहिलं राज्य

म्हणून राजेश्‍वरसिंह लक्ष्य

सध्या लखनौमध्ये कार्यरत असलेले सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) सहाय्यक संचालक राजेश्‍वरसिंह आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दूरध्वनी क्रमांकांचा पाळतीसाठीच्या संभाव्य लक्ष्यांच्या यादीत समावेश करण्यात आला होता. २०१७ ते २०१९ या काळासाठी ते ‘एनएसओ’च्या रडारवर होते. २- जी स्पेक्ट्रम वाटपात झालेल्या कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली होती. याच प्रकरणामुळे माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम अडचणीत आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com