साप, युवक आणि अजगराचा धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

वृत्तसंस्था
Friday, 25 September 2020

साप, युवक आणि अजगराचा केवळ 20 सेकंदाचा धडकी भरवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लाखो नेटिझन्सनी व्हिडिओ पाहिला असून, पुढे काय झाले असेल म्हणून प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

नवी दिल्लीः साप, युवक आणि अजगराचा केवळ 20 सेकंदाचा धडकी भरवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लाखो नेटिझन्सनी व्हिडिओ पाहिला असून, पुढे काय झाले असेल म्हणून प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

Video: सिगारेट ओढणारा खेकडा झाला व्हायरल

'The Unexplained' नावाच्या एका ट्विटर युझरने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हायरल केलेल्या व्हिडिओमध्ये एक काळ्या रंगाचा उतार आहे. यावर एक युवक उभा असून, त्याच्या समोरच एक साप पाण्यात जाण्याचा प्रयत्न करतो. युवक सापाला पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो. पण, साप पुन्हा पाण्यात जातो. याच वेळी उतारावरून एक मोठा अजगर घसरत येतो. अजगराला पाहून घाबरलेला युवक थेट पाण्यात उडी मारतो. पण, पुढे काय झाले असावे, याबाबत समजत नाही. शिवाय, व्हिडिओ कोणत्या भागातील आहे, याबाबतची पण माहिती उपलब्ध नाही. दरम्यान, केवळ 20 सेकंदाच्या हा व्हिडिओ लाखो नेटिझन्सनी पाहिला असून, प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shocking viral video man plucking snake out water and then python comes