मुलांना खूप आवडते पण मला बॉयफ्रेंडच नाही...

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

एका शाळेतील 13 वर्षाच्या मुलीने पोलिसांकडे छेडछाडीची तक्रार दाखल केली. पण, सत्य उघड झाल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला.

सुरत (गुजरात): एका शाळेतील 13 वर्षाच्या मुलीने पोलिसांकडे छेडछाडीची तक्रार दाखल केली. पण, सत्य उघड झाल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला. मैत्रिणींसाठी हे कृत्य केल्याचे तपासात तिने सांगितले.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एक 13 वर्षाच्या मुलीने छेडछाडीची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता रस्त्यात कोठही छेडछाड झाले नसल्याचे समोर आले. यामुळे पोलिसांनी मुलीला विश्वासात घेऊन खरी परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसही चक्रावून गेले.

मुलीने पोलिसांना सांगितले की, 'मला बॉयफ्रेंड नसल्यामुळे मैत्रिणी मला चिडवतात. पण, मुलांनाही मी आवडते हे त्यांना दाखवून देण्यासाठी छेडछाडीचा हा बनाव रचला होता.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: To show she is liked by boys minor girl fabricates harassment story at surat