Shraddha Murder Case: श्रद्धाच्या वडिलांनी मांडला धर्म जागृतीचा मुद्दा; मुलांच्या वयावरही बोलले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shraddha Murder Case

Shraddha Murder Case: श्रद्धाच्या वडिलांनी मांडला धर्म जागृतीचा मुद्दा; मुलांच्या वयावरही बोलले

मुंबईः देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा खून प्रकरणामध्ये रोज नवनवे अपडेट्स येत आहेत. आज श्रद्धाच्या वडिलांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी १८व्या वर्षी मुलांना स्वातंत्र्य देण्याविषयी विचार व्हावा, हा मुद्दा मांडला आहे.

मृत श्रध्दाचे वडील विकास वालकर म्हणाले की, श्रध्दाच्या दुर्दैवी मृत्यूने आम्ही खूप दुःखी झालो आहोत. आफताब पूनावाला आणि त्याच्या कुटुंबियांना कठोर शिक्षेची त्यांनी मागणी केलीय. शिवाय १८व्या वर्षी मुलांना किती स्वातंत्र्य द्यावं यावर विचार करायला हवा आणि धर्मजागृती होणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले.

मुलांवर नियंत्रण असणं आवश्यक असून वेळोवेळी त्यांचं समुपदेशन गरजेचं असल्याचं त्यांनी नमूद केलं.

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या आफताबने श्रद्धाचा निर्घृण खून केला. त्यानंतर तिचे ३५ तुकडे करुन महरौलीच्या जंगलात फेकले. हे प्रकरण उघड झाल्यानंतर खळबळ उडाली होती. सध्या आफताब पोलिसांच्या ताब्यात असून त्याची नार्को टेस्ट झाली आहे. पोलिस वेगवेगळ्या अँगलने घटनेचा तपास करीत आहेत. या पत्रकार परिषदेला भाजप नेते किरीट सोमय्या यांचीही उपस्थिती होती.

टॅग्स :crimemurderDelhi Police