Shraddha Murder Case : घरात प्रेत ठेवून खरेदीला गेला; नंतर १६ दिवस विल्हेवाट लावत बसला! आरोपीची कबुली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shraddha Walker Aaftab Poonawala Murder Case
Shraddha Murder Case : घरात प्रेत ठेवून खरेदीला गेला; नंतर १६ दिवस विल्हेवाट लावत बसला! आरोपीची कबुली

Shraddha Murder Case : घरात प्रेत ठेवून खरेदीला गेला; नंतर १६ दिवस विल्हेवाट लावत बसला! आरोपीची कबुली

श्रद्धा वालेकर या मुंबईतल्या तरुणीच्या खून प्रकरणाने जगभरात खळबळ माजली आहे. तिचाच प्रियकर आफताब पुनावाला याने तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून ते जंगलात टाकले आहेत. हा खून त्याने कसा केला, मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली या सगळ्याबद्दल त्याने दिल्ली पोलिसांना कबुली दिली आहे. काय घडलं नक्की? जाणून घ्या...

हेही वाचा - Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी आरोपी आफताब पुनावालाची कसून चौकशी केली. त्यानंतर त्याने पोलिसांना काय सांगितलं?

१. तिचा गळा आवळून खून करणं सोपं होतं. पण मृतदेहाची विल्हेवाट लावणं अवघड होतं, असं आफताबने सांगितलं.

२. म्हणून आफताबने इंटरनेटची मदत घेतली. डेक्स्टर या टीव्ही शोची या कामात त्याला मदत झाली.

३. त्यानंतर आफताबने ३०० लिटरचा एक रेफ्रिजरेटर आणला.

४. आफताबने शेफ म्हणून प्रशिक्षण घेतलं होतं. तिथे शिकलेल्या गोष्टींचा वापर करून त्याने मृतदेहाचे लहान लहान तुकडे केले.

५. हे तुकडे करण्याचं काम सोपं नव्हतं, असं आफताबने पोलिसांना सांगितलं आहे.

Shraddha Walker

Shraddha Walker

६. तुकडे करत असताना आफताब दारू प्यायचा, मास्क लावायचा किंवा कपड्याने चेहरा बांधायचा.

७. हे तुकडे करत असताना आपण अनेकदा रडलो ओरडलो असल्याचंही आफताबने सांगितलं.

८. आपण अटक होण्याच्या भीतीने मृतदेहाचे आणखी तुकडे करत गेलो, असं आफताब म्हणाला.

९. मृतदेहाचे तुकडे करून झाल्यानंतर त्याने प्लास्टिकच्या पिशवीत भरून हे तुकडे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले.

१०. यानंतर त्याने परफ्युम, डिओडरन्ट आणि अनेक उदबत्त्यांचा वापर केला जेणेकरून वास येणार नाही.

११. पुढचे १६ दिवस आफताब रोज मध्यरात्री २ वाजता हे तुकडे पिशवीत टाकून घेऊन जायचा आणि जंगलात टाकून द्यायचा, जेणेकरून प्राणी खातील.

१२. कोणाला शंका येऊ नये यासाठी त्याने आणखी बारीक तुकडे केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी टाकून दिले.

Shraddha Walekar Murder Case

Shraddha Walekar Murder Case

विशेष गोष्ट म्हणजे हे सगळं आफताबने १० हजार रुपये प्रतिमहिना भाड्याने घेतलेल्या छत्तरपूर पहाडी इथल्या घरी घडत होतं. कोणालाही हा माणूस टेन्शनमध्ये आहे असं जाणवलं नाही. त्याच्या चेहऱ्यावर कसलीच भीती किंवा काळजी नव्हती. जसं काही घडलंच नाही, अशा आविर्भावात तो वावरत असल्याचं त्याच्या शेजाऱ्यांनी सांगितलं. तसंच या फ्लॅटमध्ये त्यांनी कधीच कोणत्याही महिलेला पाहिलं नसल्याचंही त्यांनी सांगितलं.