Shradha murder case: आफताबची पॉलिग्राफ टेस्ट सुरु; FSL लॅबमध्ये पार पडणार चाचणी

यासाठी त्याला दिल्लीतील रोहिणी येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये आणण्यात आलं आहे.
Shraddha Murder Case
Shraddha Murder Casesakal

Shradha murder case: अवघ्या देशाला हादरवून टाकणाऱ्या दिल्लीतील श्रद्धा मर्डर केसमध्ये दररोज नव्या घडामोडी घडत आहेत. सध्या या प्रकरणातील आरोपी अफताबची पॉलग्राफ टेस्ट करण्यात येत आहे.

यासाठी त्याला दिल्लीतील रोहिणी येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये आणण्यात आलं आहे. या चाचणीनंतर खरं काय ते समोर येण्यास मदत होईल. (Shradha murder case Aftab polygraph test begins testing will be done at FSL Lab)

दिल्ली पोलिसांकडून काही वेळापूर्वी अफताबला एका प्रायव्हेट गाडीतून रोहिणीच्या एफएसएल लॅबमध्ये आणण्यात आलं. आजची पॉलिग्राफ चाचणी महत्वाची आहे, कारण या चाचणीनंतर पोलिसांच्या तपासाला दिशा मिळेल.

या माहितीच्या आधारे दिल्ली पोलीस पुरावे गोळा करणार आहेत. आजच्या चाचणीचा निकाल काय येईल यानंतर पुढील एक दोन दिवसात त्याची नार्को चाचणी करण्यात येईल, असंही सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

पॉलिग्राफ चाचणी म्हणजे काय?

व्यक्ती खरं बोलते की खोटं हे जाणून घेण्यासाठी पॉलिग्राफ चाचणी केली जाते. शारीरिक हालचालीतून व्यक्ती खरं बोलतो की खोटं, हे या टेस्टमधून कळतं. मात्र, ही टेस्ट शंभर टक्के खरी ठरणार, हे सांगणे कठीण आहे. पहिल्यांदा पॉलिग्राफ टेस्ट १९२१ साली अमेरिकेत करण्यात आली होती.

पॉलिग्राफ टेस्ट कशी केली जाते?

  1. ही टेस्ट करण्यापूर्वी व्यक्तीची मेडीकल टेस्ट केली जाते.

  2. पॉलीग्राफ टेस्ट दरम्यान मशीनचे चार किंवा सहा पॉइंट व्यक्तीच्या छातीवर आणि बोटांना जोडलेले असतात.

  3. व्यक्तीला सुरवातीला सामान्य प्रश्न विचारले जातात. त्यानंतर गुन्ह्यासंदर्भात प्रश्न विचारले जातात.

  4. यादरम्यान व्यक्ती जेव्हा उत्तर देतो तेव्हा मशिनच्या स्क्रीनवर त्याच्या हार्टचे ठोके, ब्लड प्रेशर, नाडी यांचं निरीक्षण नोंदवलं जातं.

  5. पूर्वी केलेली मेडीकल टेस्ट आणि या टेस्ट दरम्यान नोंदवण्यात आलेलं निरीक्षण यातला फरक जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com