Shri Ram Sene : सत्तेतल्या भाजपला बसणार दणका; श्रीराम सेनेचे प्रमुख अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवणार

हिंदूंच्या रक्षणासाठी 25 हिंदूत्ववादी 2023 ची विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवतील.
Shri Ram Sena chief Pramod Muthalik
Shri Ram Sena chief Pramod Muthalikesakal
Summary

हिंदूंना न्याय आणि सन्मान मिळवून देणं हे माझं निवडणूक लढवण्याचं उद्दिष्ट असेल.

उडुपी (कर्नाटक) : मी भ्रष्टाचाराविरोधात आणि हिंदुत्वासाठी करकला मतदारसंघातून अपक्ष म्हणून कर्नाटक विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, असं श्रीराम सेनेचे (Shri Ram Sene) प्रमुख प्रमोद मुतालिक (Pramod Mutalik) यांनी जाहीर केलं.

कार्यकर्त्यांच्या वाढत्या प्रतिसादामुळं मी करकला मतदारसंघातून (Karakala Constituency) अपक्ष म्हणून निवडणूक (Karnataka Assembly Election) लढण्याचा निर्णय घेतलाय. मी सात-आठ वेळा या मतदारसंघाला भेट दिली आहे. ह्या मतदारसंघात हिंदूंवर अन्याय होत असल्यामुळं आणि भ्रष्टाचार बोकाळल्यामुळं मुतालिक यांनी निवडणूक लढवावी, असं सर्वांचं मत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Shri Ram Sena chief Pramod Muthalik
'ती' तुम्हाला 3 हजार देत असेल, तर आम्ही एका मतासाठी 6 हजार देऊ; भाजपच्या बड्या नेत्याची मतदारांना 'ऑफर'

पत्रकारांशी बोलताना मुतालिक पुढं म्हणाले, हिंदुत्वासाठी आणि भ्रष्टाचाराविरुद्ध प्रामाणिकपणे लढता यावं यासाठी आपण निवडणूक लढवणार आहोत. हिंदूंना न्याय आणि सन्मान मिळवून देणं हे माझं निवडणूक लढवण्याचं उद्दिष्ट असेल, असंही त्यांनी स्पष्ट सांगितलं.

Shri Ram Sena chief Pramod Muthalik
Congress : धीरेंद्र चमत्कारिक असतील तर, त्यांनी 'हे' काम करुन दाखवावंच; काँग्रेस खासदाराचं ओपन चॅलेंज

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मुतालिकांनी सांगितलं होतं की, हिंदूंच्या रक्षणासाठी त्यांच्यासह 25 हिंदूत्ववादी 2023 ची विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढतील. हिंदूंच्या पाठिंब्यावर सत्तेत आलेली भाजप हिंदुत्वाचं रक्षण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, करकला हा उडुपी जिल्ह्याचा भाग आहे. सध्या भाजपचे व्ही. सुनील कुमार हे तिथले आमदार आणि राज्याचे ऊर्जामंत्री आहेत. 2004, 2013 आणि 2018 मध्ये ते करकला मतदारसंघातून निवडून आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com