धीरेंद्र चमत्कारिक असतील तर, त्यांनी 'हे' काम करुन दाखवावंच; काँग्रेस खासदाराचं ओपन चॅलेंज I Congress | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bageshwar Dham Dhirendra Shastri

बाबा राजकारणात उतरले तर ते उलटे लटकलेले दिसतील. धीरेंद्र शास्त्रींचा चमत्कार म्हणजे अंधश्रद्धा आहे, असंही गोविंद यांनी स्पष्ट केलं.

Congress : धीरेंद्र चमत्कारिक असतील तर, त्यांनी 'हे' काम करुन दाखवावंच; काँग्रेस खासदाराचं ओपन चॅलेंज

भोपाळ : मध्य प्रदेशातील बागेश्वर धामचे (Bageshwar Dham) प्रमुख धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) सध्या वादात सापडले आहेत. काँग्रेस सतत त्यांच्यावर हल्लाबोल करत आहे.

आता विरोधी पक्षनेते गोविंद सिंह (Govind Singh) यांनी शास्त्रींच्या चमत्कारावर प्रश्न उपस्थित केलाय. त्यांनी धीरेंद्र शास्त्रींना खुलं आव्हानही दिलं आहे. धीरेंद्र शास्त्री चमत्कारिक असतील तर मध्य प्रदेशचं (Madhya Pradesh) करोडोंचं कर्ज माफ करावं. आपला खिसा भरण्यासाठी धीरेंद्र जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोपही गोविंद यांनी केलाय.

हेही वाचा: चमत्कारानं जोशीमठचं भूस्खलन थांबवून दाखवा, मग आम्हीही नमस्कार करू; शंकराचार्यांचं थेट चॅलेंज

सनातन धर्माच्या (Sanatana Dharma) प्रचाराबाबत गोविंद सिंह म्हणाले, धीरेंद्र शास्त्री यांचा जन्मही झाला नसेल, तेव्हापासून मी सनातन धर्माचा प्रचार करत आलो आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी आणि आश्रमाची शान वाढवण्यासाठी ते हे सर्व करत आहेत, असंही काँग्रेस खासदारानं सांगितलं.

हेही वाचा: Lord Shri Ram : भगवान राम सीतेसोबत दररोज बसून मद्य प्यायचे; प्रसिद्ध लेखकाचं वादग्रस्त विधान

धीरेंद्र चमत्कारी होता, मग महाराष्ट्रातून का पळून आला? असा सवाल करत ते म्हणाले, मध्य प्रदेशातील 90 टक्के लोक सनातन धर्मीय आहेत. बाबा राजकारणात उतरले तर ते उलटे लटकलेले दिसतील. धीरेंद्र शास्त्रींचा चमत्कार म्हणजे अंधश्रद्धा आहे, असंही गोविंद यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा: 'ती' तुम्हाला 3 हजार देत असेल, तर आम्ही एका मतासाठी 6 हजार देऊ; भाजपच्या बड्या नेत्याची मतदारांना 'ऑफर'

विशेष म्हणजे, बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याबाबत देशात वाद वाढत आहे. या वादादरम्यान भाजपनं त्यांना उघडपणे पाठिंबा दिला आहे. नुकतेच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी हिंदू महंतावरील आरोप खोटे असल्याचं म्हटलं होतं.

टॅग्स :Madhya PradeshBjpCongress