Jay Shree Ram : जय श्रीराम! आयोध्येत सूर्य किरणांनी झाला प्रभू श्रीरामांचा अभिषेक, भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण
Ayodhya Ram Mandir Surya Tilak : रामनवमीनिमित्त प्रभू श्रीराम यांचा सूर्य किरणाने अभिषेक करण्यात आला आहे. आयोध्येतील राम मंदिरात हा सूर्य तिलक सोहळा पार पडला. यावेळी प्रभू श्रीरामांची विशेष आरतीही करण्यात आली.
रामनवमीच्या पार्श्वभूमीवर आयोध्येत उत्साहाचं वातावरण आहे. ढोल-ताशाच्या गजरात आयोध्या नगरी दुमदुमन निघाली आहे. दरम्यान आयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीराम यांची महाआरती करण्यात आली. यावेळी त्यांनी सूर्य तिलकाचा अभिषेकही करण्यात आला.