

Shubhendu Adhikari PA
esakal
पश्चिम बंगालमधील राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या चंद्रनाथ रथ (शुभेंदू अधिकारी यांचे पीए) हत्या प्रकरणात कोलकाता पोलिसांनी उत्तर प्रदेशातील ठाकूर राज सिंह याला अटक केली आहे. रविवारी रात्री अयोध्येत सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या हायप्रोफाईल अटकेमुळे उत्तर प्रदेश ते पश्चिम बंगालपर्यंत चर्चेला उधाण आले आहे.
ठाकूर राज सिंह याच्या अटकेने या हत्याकांडातील अनेक दुवे समोर येण्याची शक्यता आहे.
कोलकाता पोलिसांनी अयोध्येच्या एडीजी झोनच्या मदतीने ही कारवाई केली.