सुषमा स्वराज यांच्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार

Sushma Swaraj
Sushma Swaraj

नवी दिल्ली : हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालेल्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यावर आज (बुधवार) दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. दिल्ली सरकारकडून दोन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांना एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, मध्यरात्री त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. आज सकाळी 11 वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानीच अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव भाजपाच्या केंद्रीय कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर 3 वाजता लोधी रस्ता येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर सर्वच स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन, भारतीय राजकारणातलं एक तेजोमय पर्व हरपले अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 1977 साली वयाच्या 25 व्या वर्षी सुषमा स्वराज या कॅबिनेट मंत्री बनल्या होत्या. सर्वात कमी वयाच्या त्या कॅबिनेट मंत्री ठरल्या होत्या.

सुषमा स्वराज राजकीय कारकिर्द - 
- १९७० मध्ये त्यांना राजकीय कारकिर्दीची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून केली.
- १९७७-८२ आणि १९८७-८९ पर्यंत हरयाणा विधानसभेचे प्रतिनिधित्व केले.
- १९९० मध्ये राज्यसभेवर निवडून गेल्या.
- १९९६ आणि १९९८ मध्ये दक्षिण दिल्लीतून लोकसभेत गेल्या.
- १९९८ मध्ये त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या
- १९९९ मध्ये भाजपने सोनिया गांधींविरोधात कर्नाटकातील बल्लारी मतदारसंघातून उतरवले होते. केवळ ७ टक्के मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला.
- २००० ते २००३ पर्यंत त्या केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे काम पाहिले.
- २००३ ते २००४ मध्ये त्यांनी आरोग्यमंत्रिपद सांभाळले. त्यांच्या कार्यकाळाकतच केंद्राने ६ नव्या एम्सला परवानगी दिली होती. 
- २०१४ - २०१९ त्या परराष्ट्रमंत्री होत्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com